रविवार, 24 जून 2018
लक्षवेधी :
  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविताना इतर सुविधांची निर्मिती आवश्यक-आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात मुंबई आयआयटीचे प्रा.सतीश अग्नीहोत्री यांचे प्रतिपादन             कुरखेडा तालुक्यातील शिरपूर व अन्य ठिकाणी मामा तलावांच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट; शासनाच्या उद्देशाची झाली 'माती'! आ.क्रिष्णा गजबे यांनी दिले चौकशीचे निर्देश             वनविभागाच्या लाल झेंडीमुळे सुरजागड लोहखनिज प्रकल्प अडचणीत             जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा सहायक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात-पेंशन केस निकाली काढण्यासाठी निवृत्त महिला कर्मचाऱ्याच्या मुलाकडून स्वीकारली ४ हजार रुपयांची लाच             चंद्रपूर,गडचिरोली व यवतमाळ जिल्हयातील ६ हजार कोटींच्या रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा-केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची माहिती             गडचिरोली येथे कारमेल हायस्कूलच्या मागे नवीन घर विकणे आहे, १६०० स्क्वेअर फूट प्लॉट व १२०० स्क्वेअर फूट बांधकाम-संपर्क ७९७२८८०५१३             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

गडचिरोलीतील ७ पोलिसांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर

Wednesday, 24th January 2018 08:38:49 PM

गडचिरोली,ता.२४: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती शौयपदकाचे मानकरी ठरलेल्या पोलिस जवानांची यादी जाहीर केली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील ७ जणांचा समावेश असून, ३ अधिकारी व ४ कर्मचारी पुरस्कारास पात्र ठरले आहेत.

राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झालेल्यांमध्ये तत्कालिन अपर पोलिस अधीक्षक(अभियान) व सध्या यवतमाळचे पोलिस अधीक्षक असलेले एम.राजकुमार, सहायक पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, सहायक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे, पोलिस शिपाई नागसू उसेंडी, नीलेश मडावी, रमेश आत्राम, बबलू पुंगाटी यांचा समावेश आहे. एम.राजकुमार यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मानित करण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी राष्ट्रपती शौर्यपदकाचे मानकरी ठरलेले अधिकारी व जवानांचे अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
PH641
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना