रविवार, 24 जून 2018
लक्षवेधी :
  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविताना इतर सुविधांची निर्मिती आवश्यक-आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात मुंबई आयआयटीचे प्रा.सतीश अग्नीहोत्री यांचे प्रतिपादन             कुरखेडा तालुक्यातील शिरपूर व अन्य ठिकाणी मामा तलावांच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट; शासनाच्या उद्देशाची झाली 'माती'! आ.क्रिष्णा गजबे यांनी दिले चौकशीचे निर्देश             वनविभागाच्या लाल झेंडीमुळे सुरजागड लोहखनिज प्रकल्प अडचणीत             जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा सहायक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात-पेंशन केस निकाली काढण्यासाठी निवृत्त महिला कर्मचाऱ्याच्या मुलाकडून स्वीकारली ४ हजार रुपयांची लाच             चंद्रपूर,गडचिरोली व यवतमाळ जिल्हयातील ६ हजार कोटींच्या रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा-केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची माहिती             गडचिरोली येथे कारमेल हायस्कूलच्या मागे नवीन घर विकणे आहे, १६०० स्क्वेअर फूट प्लॉट व १२०० स्क्वेअर फूट बांधकाम-संपर्क ७९७२८८०५१३             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

महागाईविरोधात सायकल रॅली काढून काँग्रेसने केला सरकारचा निषेध

Wednesday, 31st January 2018 08:10:35 PM

गडचिरोली, ता.३१: पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीविरुद्ध काँग्रेस पक्षाच्या वतीने आज गडचिरोलीसह विविध तालुक्यांमध्ये सायकल व रिक्षा रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात आला.

कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व विधानसभेतील उपगटनेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत रॅलीची सुरुवात झाली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वाखाली सायकलरॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी सायकल व रिक्षामध्ये बसून पेट्रोल व डिझेल दरवाढीचा विरोध केला. काँग्रेसचे कार्यकर्ते गडचिरोली शहरातील सर्व पेट्रोलपंपवर गेले आणि त्यांनी निदर्शने करुन सरकारचा निषेध नोंदविला.

पेट्रोल व डिझेलच्चया दरवाढीमुळे जनतेत तीव्र असंतोष असून, जनतेची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून, सर्वसामान्य जनतेला आर्थिक फटका बसता आहे. गेल्या वर्षभरता गॅरच्या किमतीत १९ वेळा वाढ करण्यात आली आहे, तर पेट्रोल व डिझेल्या किमती दररोज वाढविल्या जात आहे. आज राज्यात पेट्रोलचा दर ८० रुपयांवर, तर डिझेलचा दर ७० रुपयांपर्यत पोहचण्याची शक्यता आहे. घरगुती गॅसचा दर प्रतिसिलिंडर ८१० रुपये झाला आहे. राज्यात इंधनावर व्हॅटसह सरचार्ज लावले जात आहेत. दुष्काळाच्या नावाखाली पेट्रोल व डिझेलवर कर लावून लूट सुरु आहे. याविरोधात काँग्रेसने आज सायकल व रिक्षावरुन मोर्चा काढून भाजप सरकारचा निषेध केला.

या आंदोलनात काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युवक काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, जिल्हा महासचिव प्रभाकर वासेकर, युवक काँग्रेसचे लोकसभाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महासचिव कुणाल पेंदोरकर, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, शहराध्यक्ष व नगरासेवक सतीश विधाते, जिल्हा परिषद सदस्य अॅड. राम मेश्राम, , ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनिकांत मोटघरे, पुरुषोत्तम मसराम, डी.डी.सोनटक्के, नंदू वाईलकर आरिफ कनोजे, आरिफ शेख, पांडुरंग दुधबावरे, बाळू मडावी, महादेव भोयर, समशेर खाँ पठाण, अतुल मल्लेलवार, नेताजी गावतुरे, बाबूराव बावणे, अमोल भडांगे, नीतेश राठोड, तुळशीदास भोयर, राकेश रत्नावार, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, वसंत राऊत, सुभाष धाईत, जितेंद्र मुनघाटे, हेमंत भांडेकर, श्री.भारद्वाज, लता ढोक, अपर्णा खेवले, निलीमा राऊत, योगेश नैताम, कमलेश खोब्रागडे, पंकज बारसिंगे, बाशिद शेेख, पियुष मडावी, तौफिक शेख, राकेश केराम यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1RZ4Q
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना