गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

गडचिरोलीच्या एसडीओ कार्यालयातील अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 1st February 2018 08:08:23 AM

गडचिरोली, ता.१: वर्ग २ ची शेतजमीन वर्ग १ मध्ये करण्याकरिता शेतकऱ्याकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज गडचिरोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुनास रंगेहाथ पकडून अटक केली. सुनील मुरलीधर दिवसे(४५), असे कारकुनाचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा शेतकरी असून, त्याने पोटहिश्श्याप्रमाणे मिळालेली स्वत:च्या मालकीची शेतजमीन बाजारभावाप्रमाणे.विकली आहे. मात्र, ही शेतजमीन वर्ग २ मध्ये असल्याने रजिस्ट्री करण्याकरिता या जमिनीचे वर्ग १ मध्ये रुपांतर करणे आवश्यक होते. त्यासाठी तक्रारकर्त्याने सर्व कागदपत्रांसह गडचिरोली येथील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयात तीन-चार वर्षांपूर्वी अर्ज केला होता. त्यासाठी तक्रारकर्ता हा वारंवार उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन आपल्या प्रकरणाविषयी विचारपूस करीत होता. परंतु काही ना काही कारणे दाखवून त्याला कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी परत पाठवीत होते.

२५ जानेवारी २०१८ रोजी तक्रारकर्त्यांने उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन आपल्या प्रकरणाबाबत अव्वल कारकून सुनील दिवसे याची भेट घेऊन विचारणा केली. परंतु त्यास वर्ग १ च्या शेतजमिनीच्या मंजूर असलेल्या आदेशाची प्रत देण्याकरिता सुनील दिवसे याने त्यास २५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती अर्धी रक्कम १० हजार रुपये स्वीकारण्यात तो तयार झाला.

मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज गडचिरोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा रचला. यावेळी अव्वल कारकून सुनील दिवसे याने तक्रारकर्त्याकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. यावरुन एसीबीने सुनील दिवसे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,१३(१)(ड) व १३(२) अन्वये गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

एसीबीचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय माहुलकर, पोलिस उपअधीक्षक रोशन यादव, डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, शिपाई रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, महेश कुकडकर, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, सोनल आत्राम, सोनी तवाडे, तुळशीदास नवघरे व घनश्याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
V9HYH
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना