बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

लग्नासाठी मुलीच्या आईला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास २० वर्षांचा सश्रम कारावास

Wednesday, 7th February 2018 07:17:43 AM

गडचिरोली, ता.७: मुलीचे लग्न आपल्यासोबत लावून दिले नाही, असे म्हणून संतापलेल्या युवकाने मुलीच्या आईवर प्राणघातक हल्ला करुन तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणातील आरोपीस सत्र न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रामचंद्र रामू हलामी(२५)रा. बामणी, ता.कुरखेडा असे दोषी इसमाचे नाव आहे.

ही घटना १८ ऑगस्ट २०१६ ची आहे. बामणी येथील देवकाबाई हिरामी ही अंगणात कपडे वाळवीत असताना रामचंद्र हलामी तिच्याजवळ गेला आणि तुझ्या मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून दिले नाही, असे म्हणून त्याने तिला अतिप्रसंग करण्याची धमकी दिली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने देवकाबाईला खाली पाडून धारदार सुरीने तिच्या पोटावर दोन वार केले. ती ओरडून घराबाहेर पळाली. तिच्या पतीने तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. तेथे डॉ.माधुरी किलनाके यांनी शस्त्रक्रिया करुन देवकाबाईचे प्राण वाचविले. त्यानंतर देवकाबाईच्या बयाणावरुन आरोपी रामचंद्र हलामी याच्यावर पुराडा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४५२,३५४ व ३०७ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. पुराडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ए.एन.पाल यांनी तपास पूर्ण करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. सत्र न्यायालयाने सर्व साक्षदारांचे बयाण नोंदवून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी रामचंद्र हलामी या २० वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
55S2O
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना