सोमवार, 18 जून 2018
लक्षवेधी :
  महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग यांचा एल्गार परिषदेशी संबंध नाही, त्यांची तत्काळ सुटका करा: भाकप व ग्रामसभांच्या नेत्यांची मागणी             कोनसरीतील लोहप्रकल्प सर्वांच्या सहकार्यामुळेच-सत्काराप्रसंगी आ.डॉ.देवराव होळी यांचे प्रतिपादन             गडचिरोली येथे कारमेल हायस्कूलच्या मागे नवीन घर विकणे आहे, १६०० स्क्वेअर फूट प्लॉट व १२०० स्क्वेअर फूट बांधकाम-संपर्क ७९७२८८०५१३             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

थिमेटयुक्त पाणी प्यायल्याने धमदीटोल्यातील नागरिकांना विषबाधा

Thursday, 8th February 2018 09:49:23 AM

कुरखेडा, ता.८: नजीकच्या धमदीटोला येथील सार्वजनिक विहिरीत अज्ञात नागरिकाने थिमेट टाकल्याने गावात खळबळ माजली आहे. थिमेटयुक्त पाणी प्यायल्याने काही नागरिकांना विषबाधा झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी व पोलिस गावात पोहचले असून, त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

कुरखेड्यापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या धमदीटोला गावाचा समावेश नान्ही ग्रामपंचायतींतर्गत होतो. गावातील काही महिला आज सकाळी नेहमीप्रमाणे सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या. काही कुटुंबीयांनी पाण्याचा वापर केला. नंतर चहा प्राशन करताच दोन-तीन जणांना उलट्या होऊ लागल्या. काही महिलांनी स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. परंतु स्वयंपाकाचीही दुर्गंधी येऊ लागली. काही क्षणातच ही वार्ता गावभर पसरली. घटनेची माहिती मिळताच भाजपचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा परिषद सदस्य नाजुक पुराम घटनास्थळी गेले. वैद्यकीय अधिकारी डॉ.दामले व सहायक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर हेही आपल्या सहकाऱ्यांसह धमदीटोला येथे पोहचले. त्यांनी गावकऱ्यांची चर्चा करुन माहिती घेतली. यावेळी सार्वजनिक विहिरीची पाहणी केली असता त्यात थिमेट हा रासायनिक पदार्थ टाकण्यात आल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले.

यावेळी सर्वांनी विहिरीतील पाणी पिऊ नये, असे आवाहन गावकऱ्यांना केले. डॉक्टरांनी विषबाधा झालेल्या नागरिकांची तपासणी करुन औषधोपचार केला. याप्रसंगी सरपंच वर्षा धुर्वे, उपसरपंच सुखदेव कोरेटी हेही उपस्थित होते.

नागरिकांनी वेळीच सावधगिरी बाळगल्याने व वैद्यकीय अधिकारी वेळेवर पोहचल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर विषबाधा होण्यापासून बचावले. थिमेट कुणी टाकले, याचा शोध पोलिस घेत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
YE41U
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना