सोमवार, 18 जून 2018
लक्षवेधी :
  महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग यांचा एल्गार परिषदेशी संबंध नाही, त्यांची तत्काळ सुटका करा: भाकप व ग्रामसभांच्या नेत्यांची मागणी             कोनसरीतील लोहप्रकल्प सर्वांच्या सहकार्यामुळेच-सत्काराप्रसंगी आ.डॉ.देवराव होळी यांचे प्रतिपादन             गडचिरोली येथे कारमेल हायस्कूलच्या मागे नवीन घर विकणे आहे, १६०० स्क्वेअर फूट प्लॉट व १२०० स्क्वेअर फूट बांधकाम-संपर्क ७९७२८८०५१३             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

थकबाकीदारांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करा:भालचंद्र खंडाईत

Thursday, 8th February 2018 04:27:53 PM

गडचिरोली, ता.८: बिलापोटी ग्राहकांकडील असलेली थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी 'शुन्य थकबाकी' मोहीम आक्रमकतेने राबवून थकबाकी न देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करा, असे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले. बुधवारी (ता..७) नागपूर येथील विद्युत भवनातील महावितरणच्या मुख्यालयात आयोजित नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती व अकोला या पाचही परिमंडळाच्या आढावा बैठकीप्रसंगी त्यांनी हे निर्देश दिले.

घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांसोबतच सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिवे यांच्यावर वीजबिलापोटी असलेल्या चालू आर्थिक वर्षातील संपूर्ण थकबाकीसोबतच मागील आर्थिक वर्षातील थकबाकी वसूल करा, थकबाकी भरण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करा, तसेच वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची नोंद प्रणालीत करण्याच्या सूचनाही प्रादेशिक संचालकांनी यावेळी दिल्या. 

प्रत्येक लाईनस्टाफ़ला थकबाकी वसुली आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे दैंनंदिन लक्ष्य द्या, थकबाकी वसुली अथवा वीजपुरवठा खंडित असे दोनच पर्याय ग्राहकापुढे ठेवा, थकबाकी वसुलीत हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच काम करण्याशिवाय पर्याय नसल्याचा संदेश सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. प्रत्येक कार्यकारी अभियंत्यांनी थकबाकी वसुलीसाठी रितसर योजना तयार करून त्याची योग्य अंमलबजावणी होत असल्याची खात्री करून घ्यावी, सोबतच वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

ग्राहकाकडील मीटरचे वाचन नियमितपणे आणि वेळीच होण्याची गरज असून महावितरण लवकरच मध्यवर्ती बिलींग प्रणाली सुरु करीत असल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांची मानसिकता बदलण्याची गरज असून त्यासाठी रोजचे काम रोज करण्याची सवय लागणे आवश्यक आहे. चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक, तर काम न करणाऱ्यांना शिक्षा ही होणारच, असे सांगतांनाच खंडाईत यांनी वीजप्रवाहामुळे जंगली प्राण्यांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही उपस्थितांना केल्या.

या बैठकीला नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रफ़ीक शेख, चंद्रपूर परिमंडळाचे दिलीप घुगल, अकोला परिमंडळाचे अरविंद भादीकर, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, गोंदिया परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता लीलाधर बोरीकर, अमरावती परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता सुहास मेत्रे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार यांच्यासह परिक्षेत्रांतर्गत असलेलेल अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते व लेखा अधिकारी उपस्थित होते.

डॅशबोर्डच्या आधारे पेपरलेस बैठक

कालची ही बैठक केवळ डॅशबोर्डवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर झाल्याने पेपरलेस कामकाजाकडे महावितरणची प्रभावी वाटचाल सुरु झाली आहे. ही बैठक डॅशबोर्डवर आधारीत होणार असल्याची पूर्वकल्पना सर्व संबंधितांना देण्यात आल्याने कुठलाही कागद, नोंदी, अहवाल, फ़ाईल्स आदीचा पसारा न मांडता प्रत्येकाने डॅशबोर्डवरील संबंधित माहिती अत्यंत उत्साहीपणे मांडली. महावितरणच्या प्रत्येक अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्‍याला डॅशबोर्डचा वापर प्रभावीपणे करता यावा, यासाठी यापुढील प्रत्येक बैठका डेशबोर्डवरील माहितीच्या आधारावरच घेण्यात येतील, असे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0XS6R
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना