गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

शेकापच्या नेतृत्वात शेकडो पानठेलाचालक धडकले गडचिरोलीच्या तहसील कार्यालयावर

Thursday, 8th February 2018 04:46:35 AM

गडचिरोली, ता.८: मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने पानठेलाचालकांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात आज शेतकरी कामगार पक्षाचे निमंत्रक रामदास जराते यांच्या नेतृत्वात शेकडो पानठेलाचालकांनी गडचिरोलीच्या तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन दिले.

निवेदनात शेकापने म्हटले आहे की, मागील आठवड्यापासून अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिस विभागाने जिल्हाभरात पानठेल्यांवर धाडसत्र राबवून सुगंधित तंबाखू जप्तीच्या नावावर सुपारी व अन्य साहित्यही ताब्यात घेतले आहे. यामुळे शेकडो पानठेले बंद झाले असून, ते बेरोजगार झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उदरनिर्वाहाचे संकट ओढवले आहे. प्रशासनाच्या मोहिमेमुळे पानठेलाचालकांमध्ये दहशत पसरली असून, सर्व पानठेलाचालकांच्या कुटुंबीयांच्या पालनपोषणाची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारावी. तसेच पर्यायी व्यवसायाकरिता सुविधा व आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेकापने केली. निवेदनाची तत्काळ दखल न घेतल्यास पानठेलाचालकांच्या हक्कासाठी शेकाप जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात शेकापचे निमंत्रक रामदास जराते, रोहिदास कुमरे यांच्यासह रवीशंकर बारापात्रे, सुनील ब्राम्हणवाडे, ईश्वर सहारे, संजय रामटेके, दामोधर निकुरे, संतोष एडलावार, मोतीराम रहाटे, राजू दंडिकवार, दीपक बाबनवाडे, लहानू राऊत, शरद हेडाऊ, सचिन तुंगीडवार, योगेश धोडरे, सलीम शेख, प्रफुल्ल साखरे, देवेंद्र बांबोळे, मयूर कोहपरे, जावेद अली, नीलेश चिलबुले, घनश्याम झाडे, सुनील मुळे, बंडू निंबोरकर, अतीश जल्लेवार, सचिन मांडवकर, राकेश चिकराम, सुनील कोंडावार, परका बुरेवार, नितेश नैताम, राकेश भांडेकर, राहुल बारापात्रे, आकाश चौधरी, सचिन मेश्राम, शेख इम्रान, प्रताश निकुरे, देवा भांडेकर, शिवाजी उप्पलवार, प्रमोद येनगंटीवार, परेश मेश्राम, शामराव बारापात्रे, सौरभ हजारे, जालींद्र, राजू मोहुर्ले, क्रिष्णा निकुरे इत्यादी पानठेलाचालक सहभागी झाले होते.

उद्या घालणार तहसीलदारांना घेराव

दरम्यान, पानठेलाचालकांच्या वतीने ९ फेब्रुवारीला शेकाप व शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती रामदास जराते यांनी दिली. उद्या सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी चौकातून पानठेलाचालकांची रॅली निघणार असून, ते तहसील कार्यालयावर धडकणार आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
PW9L1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना