शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

डीडी क्रिकेट क्लब ठरला पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेचा विजेता

Monday, 19th February 2018 06:29:05 AM

गडचिरोली, ता.१९: युवा पत्रकार स्व. रंगय्या रेपाकवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गडचिरोली येथील पत्रकारांच्या एका ग्रूपच्या वतीने गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर रविवारी(ता.18) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत डीडी क्रिकेट क्लबने विजेतेपद पटकावले. झेडझेड क्रिकेट क्लब उपविजेता, तर डीएफ क्रिकेट क्लब तृतीय व एलझेड क्रिकेट क्लब चौथ्या स्थानी राहिला. 

सर्वप्रथम सकाळी साडेदहा वाजता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अॅड. राम मेश्राम, पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे, वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रसुरेश डोंगरवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, पत्रकार अरविंद खोब्रागडे, प्रा. अनिल धामोडे, अविनाश भांडेकर व जयंत निमगडे प्रामुख्याने उपस्थित होते. 

पहिला सामना संघमालक गजेंद्र डोमळे, कर्णधार रूपराज वाकोडे यांच्या नेतृत्वातील झेडझेड क्रिकेट क्लब व संघमालक सतीश त्रिनगरीवार, कर्णधार अरविंद खोब्रागडे यांच्या नेतृत्वातील एलझेड क्रिकेट क्लब यांच्यात रंगला. यामध्ये झेडझेड क्रिकेट क्लबने विजय संपादन केला. सामनावीर म्हणून अनिल तिडके यांना गौरविण्यात आले. 

दुसरा सामना संघमालक अविनाश भोंडे, कर्णधार नंदकिशोर पोटे यांच्या नेतृत्वातील डीएफ क्रिकेट क्लब व संघमालक बलराम सोमनानी, कर्णधार नीलेश पटले यांच्या नेतृत्वातील डीडी क्रिकेट क्लबमध्ये रंगला. यामध्ये डीडी क्रिकेट क्लबला विजयश्री मिळाली. सामनावीर म्हणून नीलेश पटले यांना गौरविण्यात आले. 

तिसरा सामना डीएफ क्रिकेट क्लब व एलझेड क्रिकेट क्लब यांच्यात झाला. त्यात डीएफ क्रिकेट क्लबने सहज विजय मिळवला. सामनावीर म्हणून नंदकिशोर पोटे यांना गौरविण्यात आले. अंतिम सामना झेडझेड क्रिकेट क्लब व डीडी क्रिकेट क्लबमध्ये रंगला. या सामन्यात विजय मिळवून डीडी क्रिकेट क्लबने स्पर्धेचे जेतेपद पटकाविले. सामनाविराचा पुरस्कार रवी कांबळे यांना प्रदान करण्यात आला, तर मालिकावीर म्हणून नीलेश पटले, उत्कृष्ठ फलंदाज म्हणून रूपराज वाकोडे, उल्कृष्ठ गोलंदाज म्हणून बलराम सोमनानी व उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून सरफराज पठाण यांना गौरविण्यात आले. 

सायंकाळी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी खा. अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, भाजपचे नेते बाबूराव कोहळे, जि.प. चे माजी अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, दामोधर अरिगेला, डॉ. चंद्रेसुरेश डोंगरवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
NT4KO
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना