मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

सागवान तस्करांचा वनकर्मचाऱ्यांवर हल्ला

Tuesday, 20th February 2018 06:14:15 AM

सिरोंचा, ता.२०: गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांवर सागवान तस्करांनी दगडांचा मारा केला. यावेळी वनकर्मचाऱ्यांनी हवेत गोळीबार केल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना आज पहाटे पावणे दोन वाजताच्या सुमारास जोडेपल्ली गावालगतच्या जंगलात घडली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन सागवान लाकडे व अन्य साहित्य असा एकूण साडेसहा लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.

परिसरातील जंगलात सागवान तस्कर सक्रिय असल्याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक डॉ.तुषार चव्हाण, उपविभागीय वनाधिकारी शंकर गाजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी वि.वा.नरखेडकर हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह काल(ता.१९)रात्री रंगधामपेठा ते चितरवेला परिसरातील जंगलात गस्तीवर गेले. आज मध्यरात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास त्यांना लाकूडतस्कर बैलगाड्यांमध्ये सागवान लाकडे घेऊन जात असल्याचे दिसले. वनकर्मचाऱ्यांनी लाकूडतस्करांचा पाठलाग करुन जोडेपल्ली गावाच्या मागील भागात त्यांना घेरले. ही बाब लक्षात येताच लाकूडतस्करांनी वनकर्मचाऱ्यांवर दगडांचा मारा करणे सुरु केले. त्यांना पांगविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर लाकूडतस्कर बैल सोडून अंधारात पळू लागले. दरम्यान एका लाकूडतस्कराचा पाठलाग करीत असताना तो खाली पडला. त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला व उजव्या हाताच्या दंडाला दुखापत झाली. वनकर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. तिरुपती नाराण्ण सदनपू(३६)रा. राघवरावनगर असे त्याचे नाव आहे. 

वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरुन ७ बंड्या, ९ बैल, ४५०० घनमीटरचे २४ सागवान लाकडे ताब्यात घेतले. बाजारभावानुसार सागवान लाकडांची किंमत २ लाख १६ हजार रुपये, बैलांची किंमत ३ लाख ६० हजार रुपये व ७० हजार रुपयांच्या बंड्या असा एकूण ६ लाख ४६ हजार रुपये किमतीचा माल वनकर्मचाऱ्यांनी जप्त केला. याप्रकरणी वनतस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, वनपरिक्षेत्राधिकारी वि.वा.नरखेडकर तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
14OHR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना