शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

नक्षल्यांनी केली पोलिस पाटलाची हत्या

Thursday, 22nd February 2018 02:49:31 AM

गडचिरोली, ता.२२: सशस्त्र नक्षल्यांनी काल(ता.२१)रात्री एटापल्ली तालुक्यातील लांजी येथील पोलिस पाटलाची गळा चिरुन हत्या केली. कटिया पैका कुमोटी(५४) असे मृत पोलिस पाटलाचे नाव आहे.

काल रात्री  कटिया कुमोटी हे पत्नी, मुलगा व सुनेसह शेतात होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास १५ ते २० सशस्त्र नक्षलवादी शेतावर गेले. त्यांनी पोलिस पाटील कटिया कुमोटी यास बाहेर नेले. कटियाच्या पत्नीने जाब विचारला असता नक्षल्यांनी काहीही उत्तर दिले नाही. आज सकाळी गावाबाहेरच्या जंगलात कटियाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करुन नंतर गळा चिरण्यात आला, अशी प्राथमिक माहिती आहे. काही दिवसांपूर्वी लांजी गावानजीकच्या जंगलात चकमक उडाली होती. या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला होता. त्यामुळे पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी कटिया कुमोटी याची हत्या केली असावी, असा अंदाज आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
812R4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना