मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

कौशल्य विकासात उत्कृष्ठ कार्याबद्दल प्रा. अनिल धामोडे विभागीय स्तरावर सन्मानित

Wednesday, 21st March 2018 05:56:31 AM

गडचिरोली, ता.२१: नागपूर विभागीय स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल येथील शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.अनिल धामोडे यांचा नुकताच विभागीय स्तरावर सत्कार करण्यात आला.

नागपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे, तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय निरीक्षक रवी मेहेंदळे, पवार, पुंड, प्राचार्य दारुंडे आदी उपस्थित होते.

शैक्षणिक सत्र २०१७-१८ मध्ये नागपूर विभागातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राबविण्यात आलेल्या विविध कौशल्य विकास उपक्रमात प्रा.धामोडे यांनी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल सहसंचालक चंद्रकांत निनाळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

प्रा.धामोडे यांनी आपल्या यशाचे श्रेय शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री, उपाध्यक्ष के.के.पाटील भोयर, सचिव डी.एम.म्हशाखेत्री, सहसचिव दादाजी चापले व सर्व सदस्य तसेच प्राचार्य जी.एम.दिवटे यांना दिले आहे. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अनंत सोमकुवर, संस्था पदाधिकारी व प्राचार्य यांचे योग्य मार्गदर्शन तसेच सहकार्यामुळेच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे प्रा.धामोडे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
QDKVF
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना