मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

जितेंद्र राऊत नेट, सेट परीक्षा उत्तीर्ण

Tuesday, 27th March 2018 12:12:02 AM

गडचिरोली, ता.२७: येथील कॅम्प एरियातील रहिवासी जितेंद्र हरिश्चंद्र राऊत यांनी वाणिज्य विषयात नेट व सेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.

जितेंद्र राऊत यांनी एम.कॉम.पर्यंतचे शिक्षण स्थानिक शिवाजी महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 'कंपनी सेक्रेटरी'ची पदवीही प्राप्त केली. सध्या ते नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये एम.फील करीत असून, डॉ.पराग जोशी यांच्या मार्गदर्शनात 'अ स्टडी ऑन फायनान्शिअल डेरिवेटीव्ह' या विषयावरील प्रबंधही रातुम नागपूर विद्यापीठाकडे सादर केला आहे. अलिकडेच त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात येणारी नेट व पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे घेतली जाणारी सेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई रेखा राऊत, बहीण रिचा राऊत, मामा प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर व नातेवाईकांना दिले आहे. या यशाबद्दल जितेंद्र राऊत यांचे चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
01Z11
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना