मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

पद्मश्रींच्या समाजसेवेने भारतरत्न भारावून जातो तेव्हा....

Sunday, 1st April 2018 07:29:55 AM

गडचिरोली, ता.१: खरे तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार. तो खूप मोठ्या कर्तृत्ववान व्यक्तींनाच मिळतो. पण, भारतरत्न पुरस्काराने गौरवान्वित झालेल्या व्यक्तीने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तीसोंबत तब्बल दीड तास आपल्या घरी घालवावा, त्यांना पाहुणचार करावा आणि त्याच्या कार्याने भारावून जावे, याला काय म्हणावे?

होय, असा दुर्मिळ योग आज मुंबईत आला. पद्मश्री आणि रमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे या सेवाव्रती दाम्पत्यासोबत आज मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची भेट झाली. आमटे दाम्पत्य आज एका कार्यक्रमानिमित्त मुंबईत होते. निमित्त झाले आणि भारतरत्न सचिनने प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांना क्षणाचाही विलंब न लावता आपल्या निवासस्थानी  आज सकाळी बोलावून घेतले. यावेळी सचिनने आमटे दाम्पत्याच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली आणि तीही तब्बल दीड तास!

या भेटीत प्रकाशभाऊ आणि मंदाताईंना सचिनला घडविणाऱ्या त्याच्या आईशीही दीर्घ चर्चा करण्याचा योग आला. अत्यंत अभावग्रस्त भागात; जेव्हा लोक निरक्षर होते, जेव्हा लोकांना शेती करणे माहित नव्हते, जेथील लोक शहरातील माणसाला पाहून दूर पळायचे आणि जेथे हिंस्त्र प्राण्यांची दहशत होती, अशा काळात प्रकाशभाऊ आणि मंदाताईंनी एका झोपडीत राहून माडिया, गोंड आदिवासींची सेवा करण्यास प्रारंभ केला. त्या ४५ वर्षांचा सेवापट सचिनच्या डोळ्यापुढे उभा राहिला आणि हा भारतरत्न अक्षरश: भारावून गेला. 'आपण माझ्यापेक्षा खूप मोठं काम केलं आहे.', अशा शब्दात सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या. सचिनच्या आईने 'प्रकाश आमटे-द रिअल हीरो' हा चित्रपट बघितला होता. त्यामुळे त्यांनाही आमटे दाम्पत्यास भेटण्याची इच्छा होती. आज सचिनच्या आईची ही इच्छा पूर्ण झाली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
LS651
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना