गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मंत्री, खासदार व आमदारांना घेराव

Sunday, 8th April 2018 06:37:24 AM

गडचिरोली, ता.८: कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे या प्रमुख मागणीसाठी आज राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री, खासदार व आमदारांना घेराव घालून निवेदन दिले. 

कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ६ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. परंतु महिना लोटूनही शासनाने दखल न घेतल्याने आज कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री, खासदार व आमदारांना घेराव घातला. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष वकील खेडकर, सचिव प्रशांत बांबोळे यांच्या नेतृत्वात आज सकाळी गडचिरोली येथे खासदार अशोक नेते व ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. त्यानंतर चामोर्शी येथे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम व आमदार डॉ.देवराव होळी यांनाही निवेदन देण्यात आले. 

राज्य शासनाच्या अनेक विभागांमध्ये कंत्राटी कर्मचारी १५ ते २० वर्षांपासून अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करीत असून, हे कर्मचारी उच्चशिक्षित, अनुभवी व प्रशिक्षित आहेत. परंतु त्यांना सेवेत कायम करण्यात आले नाही. बऱ्याच कर्मचाऱ्यांचे वय ४५ ते ५० दरम्यान असल्याने त्यांना दुसऱ्या सेवेत जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे सर्वांना शासकीय सेवेत कायम करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केली. 

यावेळी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आ.विजय वडेट्टीवार व आमदार डॉ.देवराव होळी यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

या आंदोलनात महासंघाचे कार्याध्यक्ष मनोहर वाकडे, उपाध्यक्ष प्रकाश लाडे, सहसचिव राकेश बरडे, सदस्य गोविंद कुंदमवार, लवकुश उरकुडे, गणेश ठाकरे, गजानन परचाके, प्रभाकर नरोटे, पंकज खरवडे, ओमप्रकाश निकुरे, भुमेश्वरी वाढई, रेखा कोवासे यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
94V49
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना