मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षल्यांनी पेरुन ठेवलेले २ भूसुरुंग निकामी

Monday, 9th April 2018 05:42:57 AM

गडचिरोली, ता.९: धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे नक्षल्यांनी पेरुन ठेवलेले दोन भूसुरुंग निकामी करण्यात पोलिसांना यश आले. यामुळे पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट फसला.

८ एप्रिलला संध्याकाळी मुरुमगाव येथे बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नक्षल्यांनी भूसुरुंग पेरुन ठेवल्याची माहिती मिळताच मुरूमगाव पोलिस मदत केंद्रातील पोलिस अधिकारी, सीआरपीएफ व एसआरपीच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन भूसुरुंगाचा शोध घेतला. यावेळी दोन भूसुरुंग पेरुन ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकास पाचारण केले. त्यानंतर आज सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील यांच्या उपस्थितीत दोन्ही भूसुरुंग निकामी केले. हे भूसुरुंग १० ते १५ किलो वजनाचे होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
H90BM
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना