गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

महागाईच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले उपोषण

Tuesday, 10th April 2018 05:22:06 AM

गडचिरोली, ता.९: देशात शांतता व बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठी, तसेच महागाईच्या विरोधात आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

माजी खासदार मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पक्षाचे निरीक्षक सुरेश भोयर, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, माजी प्रदेश सचिव हसनअली गिलानी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, जिल्हा परिषद सदस्य अॅड.राम मेश्राम, माजी जिल्हा परिषद सदस्य पी.आर.आकरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, युवक काँग्रेसचे लोकसभाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, नगरसेवक सतीश विधाते, पुरुषोत्तम मसराम, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पौर्णिमा भडके, कल्पना नंदेश्वर, तालुकाध्यक्ष ज्योती गव्हाणे, वर्षा गुलदेवकर, आरती कंगाले, निशा गेडाम, सोनुले, मंजुषा आत्राम, लता ढोक, अपर्णा खेवले यांच्यासह अन्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी नेत्यांनी भाजप सरकारवर ताशेरे ओढत सरकारी धोरणांचा निषेध केला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
DFH04
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना