शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

नगरमधील शिवसैनिकांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करा

Tuesday, 10th April 2018 07:41:38 AM

देसाईगंज, ता.१०:अहमदनगर जिल्ह्यात दोन शिवसैनिकांची हत्या करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी आज देसाईगंज येथील शिवसैनिकांनी केली.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम यांच्या नेतृत्वात आज शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. ३ दिवसांपूर्वी केडगाव पोटनिवडणुकीदरम्यान शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा देसाईगंज येथील शिवसैनिकांनी तीव्र निषेध केला. आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी अविनाश गेडाम यांनी निवेदनाद्वारे केली. शिष्टमंडळात शिवसेनेचे शहरप्रमुख डॉ.श्रीकांत बन्सोड, नंदू चावला, शहरप्रमुख शंकर बेदरे, उपशहरप्रमुख विकास प्रधान, अजय मिसार, विक्की कोराम, दुर्गेश बांगरे आदींचा समावेश होता.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
S5KH4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना