सोमवार, 18 जून 2018
लक्षवेधी :
  महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग यांचा एल्गार परिषदेशी संबंध नाही, त्यांची तत्काळ सुटका करा: भाकप व ग्रामसभांच्या नेत्यांची मागणी             कोनसरीतील लोहप्रकल्प सर्वांच्या सहकार्यामुळेच-सत्काराप्रसंगी आ.डॉ.देवराव होळी यांचे प्रतिपादन             गडचिरोली येथे कारमेल हायस्कूलच्या मागे नवीन घर विकणे आहे, १६०० स्क्वेअर फूट प्लॉट व १२०० स्क्वेअर फूट बांधकाम-संपर्क ७९७२८८०५१३             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

देसाईगंज येथे घरात घुसून शिक्षकाचा खून, एक संशयित ताब्यात

Thursday, 12th April 2018 12:24:37 PM

देसाईगंज, ता.१२: येथील हनुमान वॉर्डात घरात घुसून एका शिक्षकाचा खून केल्याची खळबळजनक घटना काल(ता.११)रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. राजाराम परशुरामकर(५४)असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

राजाराम परशुरामकर हे कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मुलाची प्रकृती बरी नसल्याने तो नागपुरातील एका रुग्णालयात उपचार घेत होता. त्यामुळे परशुरामकर यांची पत्नी व मुलगी नागपुरात होते, तर श्री.परशुरामकर हे घरी एकटेच होते. दरम्यान, मुलाची सुटी झाल्याने पत्नी, मुलगी व मुलगा काल रात्री ८ वाजताच्या सुमारास घरी पोहचले. त्याचवेळी तीन-चार युवक घरातून पळून जाताना दिसले. मुलीने आत जाऊन बघितले असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. माहिती देताच पोलिस घटनास्थळी पोहचले. पळून जाणाऱ्या युवकांपैकी एका युवकाला आपण ओळखत असल्याचे परशुरामकर यांच्या मुलीने पोलिसांना सांगितले. आज सकाळी श्वान पथक घटनास्थळी आले होते. मुलीच्या बयाणावरुन पोलिसांनी एका संशयित युवकास ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, परशुरामकर यांचा खून कुणी व कशासाठी केला, याविषयी चर्चा सुरु झाली असून, पोलिस तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
2ZBXO
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना