गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

मृतावस्थेत आढळला पतसंस्थेचा अभिकर्ता

Friday, 13th April 2018 02:45:16 AM

कुरखेडा, ता.१३: नजीकच्या धमदीटोला-तळेगाव बायपास मार्गावरील शेतशिवारात आज शुक्रवारी सकाळी एका ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजलेली आहे. क्रिष्णा चरणदास पेंदाम असे मृत इसमाचे नाव असून, तो गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेत आरडी अभिकर्ता म्हणून कार्यरत होता.

मूळ अंगारा अंगारा येथील निवासी असलेला क्रिष्णा पेंदाम हा आपल्या कुटुंबीयांसह गांधीनगर (कूरखेडा) येथे राहत होता. आज पहाटे तो कुटुंबीयांना फेरफटका मारुन परत येतो, असे सांगून घराबाहेर पडला. मात्र, तो परत आला नाही. सकाळी या मार्गावरून जाणाऱ्यांना त्याचा मृतदेह दिसून आला. त्याच्या तोडांतून फेस निघत होता. विषारी द्रव्य प्राशन केल्यामुळे त्याचा मृत्यु झाला असावा, असा अंदाज आहे. याच मार्गावर मागील दीड महिण्यापूर्वी एका तरूणीची हत्या झाली होती, हे विशेष. घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गजानन पडळकर यानी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. क्रिष्णाचा मृत्यु कशामुळे झाला? त्याच्या मृत्युस कारणीभूत कोण? याविषयी पोलिस तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
3JSTR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना