शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

२० एप्रिलला साजरा होणार उज्ज्वला योजना दिवस

Friday, 13th April 2018 07:26:37 AM

गडचिरोली, ता.१३: केंद्र शासनाने सुरु केलेल्या उज्ज्वला गॅस योजनेसंबंधी जनजागृती करण्यासाठी येत्या २० तारखेला उज्ज्वला योजना दिवस साजरा करण्यात येणार असून, या दिवशी सर्वत्र एलपीजी पंचायती आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा नोडल अधिकारी श्री.आशिषकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला एलपीजीचे वितरण मनिष समर्थ उपस्थित होते. श्री.आशिषकुमार यांनी सांगितले की, सध्या जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजनेचे ५७ हजार २३ कनेक्शन्स आहेत. यापुढील काळात ग्रामस्वराज्य अभियान राबवून अडपल्ली चक, महागाव(बु),चेरपल्ली, छल्लेवाडा, गोविंदगाव, जाफ्राबाद चेक, गुमलकोंडा व नडीकुडा या गावांमध्ये सर्व पात्र लाभार्थींना गॅसचे वितरण केले जाणार आहे. शिवाय १४ एप्रिल ते ५ मे या कालावधीत विस्तारित उज्ज्वला योजना राबविण्याचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अंत्योदय योजनेचे लाभार्थी, वनवासी, पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी व सर्वांत मागासलेल्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

पूर्वी ज्या लाभार्थींनी कर्जावर गॅस कनेक्शन घेतले त्यांच्या सबसिडीची रक्कम दरमहा कर्ज फेडण्यासाठी कपात केली जात होती. परंतु यापुढे ६ वेळा सिलिंडर भरल्यानंतर सातव्या वेळेपासून सबसिडीची रक्कम कर्जात कपात केली जाईल. २० एप्रिल रोजी जिल्ह्यातील १६ ठिकाणी पंचायती आयोजित करण्यात आल्या असून, त्यात एलपीजीबाबत जनजागृती, सुरक्षितता व योग्य वापर याविषयीची माहिती दिली जाणार असल्याचे श्री.आशिषकुमार यांनी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SASU5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना