गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत १५ एप्रिलला गडचिरोलीत

Saturday, 14th April 2018 06:01:08 AM

गडचिरोली,ता.१४: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत रविवारी १५ एप्रिल रोजी गडचिरोलीत येणार असून, त्यांच्या हस्ते महिला व बालकल्याण रुग्णालय आणि नियोजन विभागाच्या इमारतीचे लोकार्पण होणार आहे.  

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत रविवारी सकाळी नागपूर येथून सकाळी ११ वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोलीत पोहचतील. त्यानंतर लगेच इंदिरा गांधी चौकातील महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण करतील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निर्मित नियोजन विभागाच्या इमारतीचेही लोकार्पण करुन उपस्थितांना संबोधित करतील. पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य नागो गाणार, मितेश भांगडिया, अनिल सोले, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त श्री.अनुपकुमार, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ.संजीव कुमार, जिल्हाधिकारी संजय सिंह, पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय जायस्वाल उपस्थित राहतील. नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी केले आहे.                                                                                           

       

 

 

     


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
94P8A
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना