/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१५: लॉयड मेटल्सच्या कोनसरी येथील लोहप्रकल्पातून भरपूर रोजगार निर्मिती होणार असून, बेरोजगारी दूर होण्यास मदत मिळेल. सरकार अशा उद्योगांच्या पाठिशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालय तसेच जिल्हा नियोजन विभागाच्या इमारतीचे उद्घाटन श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत, पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.क्रिष्णा गजबे, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालु दंडवते, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त श्री.अनुपकुमार, पोलिस महानिरीक्षक शरद शेलार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल, लॉयड मेटल्सचे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात विपुल खनिज संपत्ती आहे. त्याअनुषंगाने येथे लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीने लोहप्रकल्प उभारण्याचे ठरविले आहे. कोनसरी येथे हा प्रकल्प होणार आहे. हा प्रकल्प झाल्यास बेरोजगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल. स्थानिकांनाच रोजगार द्यावा, या अटीवरच आपण या प्रकल्पाला परवानगी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एखादा उद्योग सुरु झाल्यास मॅग्नेट तयार होतो आणि अन्य उद्योजकही पुढे उद्योग उभारण्यास पुढे सरसावतात. यामुळे विकासात भर पडते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. याप्रसंगी कोनसरी येथील लोकप्रकल्पासाठी जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.