शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

कृषी महाविद्यालयाचे ५ विद्यार्थी अपघातात जागीच ठार, ४ जण जखमी

Monday, 16th April 2018 12:48:32 AM

गडचिरोली, ता.१६: टाटा सफारी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टिप्परला धडक दिल्याने ५ विद्यार्थी जागीच ठार, तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल(ता.१५)रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावाजवळ घडली.

मृतकांमध्ये प्रशांत सुधाकर रणदिवे(२४)रा.बल्लारशा, अंकित वेलादी(२२) रा.डुम्मे, ता.एटापल्ली, निहाल प्रदिते(२१)रा.आमगाव, जि.गोंदिया, प्रणय रमेश सिडाम(२०)रा.आष्टी, ता.चामोर्शी व वैभव पावे(१८)रा.पेंढरी, ता.धानोरा या पाच जणांचा समावेश आहे. दीपक जयराम निमकर()रा.वणी, जि.यवतमाळ, आकाश तडवी(१९)रा.जळगाव,  जुनेद कादरी(१९) रा.कोरपना, जि.चंद्रपूर व  शुभम मंगरे(२२) रा. गडचिरोली अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण गडचिरोली येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते.

उपरोक्त नऊ जण एमएच ४०-ए सीओ ३३५ क्रमांकाच्या टाटा सफारी वाहनाने आरमोरीवरुन गडचिरोलीच्या दिशेने येत होते. दरम्यान, चुरमुरा गावानजीक पोहचताच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच ३४ एबी ५४३ क्रमांकाच्या टिप्परला टाटा सफारी वाहनाने जोरदार धडक दिली. यात ५ जण जागीच ठार झाले, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर नागपूरला हलविण्यात आले आहे.आरमोरी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RZ5VR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना