गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नाना पटोलेंनी घेतली एनआरएचएम कर्मचाऱ्यांची भेट

Monday, 16th April 2018 08:24:39 AM

गडचिरोली, ता.१६: मागील सहा दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारलेल्या एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन माजी खासदार नाना पटोले यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विधिमंडळ व न्यायालयीन लढाईद्वारे कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन श्री.पटोले यांनी दिले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी व अधिकारी मागील १० वर्षांपासून अल्प मानधनावर काम करीत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी शासकीय सेवेत घेण्यात यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. हे सर्वजण जिल्हा परिषदेपुढे मंडप घालून बसत आहेत. दरम्यान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले हे पक्षाच्या मोर्चासाठी गडचिरोलीत आले असता त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मंडपात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर, प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. आरोग्य सेवेत किती पदे रिक्त आहेत, याविषयी माहिती देण्यास सांगितले. एनआरएचएम कर्मचाऱ्यांचा प्रश्न आपण विधीमंडळात मांडू व न्यायालयात रिट पिटीशन दाखल करुन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन श्री.पटोले यांनी दिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VZE54
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना