गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

सिंचनविषयक कामांना गती द्या:खा.अशोक नेते

Thursday, 19th April 2018 01:15:04 AM

गडचिरोली, ता.१९: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील सिंचनविषयक कामांना गती देऊन लाभक्षेत्र वाढीचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करा, असे निर्देश खा.अशोक नेते यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

नागपुरातील सिंचन सेवा भवन येथे आयोजित सिंचन विभागाच्या आढावा बैठकीत खा.नेते यांनी उपरोक्त निर्देश दिले. या बैठकीला चिमूरचे आ.कीर्तिकुमार भांगडिया, माजी आमदार प्रा.अतुल देशकर, भाजपच्या किसान संघाचे विदर्भ महामंत्री उदय बोरावार, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भाजपचे जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, होमदेव मेश्राम, ईश्वर कामडी, अविनाश पाल, विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक सुर्वे, तसेच सर्व अधीक्षक व कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

वैनगंगा नदीच्या उपनद्यांवर बंधारे बांधण्याकरिता सर्वेक्षण सुरु असून, बांडिया नदीवरील पयडी, पोहार नदीवरील चितेकन्हार व थाटरी, सती नदीवरील अरततोंडी, कठाणी नदीवरील आंबेशिवणी, पोहार नदीवरील पोटेगाव, जयसिंगटोला, बोरिया नदीवरील गव्हाळहेटी, पोटफोडी नदीवरील रानमूल व कुभी, गाढवी नदीवरील किन्हाळा असे १२ बंधारे निधीकरिता शासनस्तरावर प्रलंबित असल्याची माहिती जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.गोन्नाडे यांनी दिली.

लहान नद्यांवर पूर्व क्षेत्रात चेकडॅम कम बंधारे बांधून संलग्न गावांमध्ये पाणी साठविण्याकरिता इतर स्थळांचे सर्वेक्षण सुरु असल्याची माहितीही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. त्याचप्रमाणे घोट-रेगडी परिसरातील १४ गावांच्या सिंचनाची समस्या सोडविण्याकरिता वनजमिनीची आडकाठी येत असून, त्यावर पर्याय शोधणे सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. लोंढोली उपसा सिंचन योजना रद्द करुन राजीव उपसा सिंचन योजना(भेंडाळा)तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश खा.अशोक नेते यांनी दिले. यावर लोंढोली योजना रद्द करुन भेंडाळा उपसा योजना कार्यान्विेत करण्यात येत असल्याचे व दोन्ही योजना एकच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे डोंगरगाव उपसा सिंचन योजनादेखील चिचडोह बॅरेजमधून लाभान्वित होणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी खा.नेते यांच्या निर्देशानुसार पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री.सुर्वे यांनी आ.कीर्तिकुमार भांगडिया व माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी सूचित केलेल्या प्रस्तावांचा अहवाल एक महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले. खा.नेते यांनी सिंचनविषयक कामांना गती देऊन लाभक्षेत्र वाढीचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
DRPS5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना