बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

११ नक्षल्यांची ओळख पटली, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता?

Monday, 23rd April 2018 07:43:29 AM

गडचिरोली, ता.२३: काल सकाळी भामरागड-एटापल्ली तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील बोरिया जंगलात पोलिसांशी झालेल्या तुंबळ चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले होते. त्यातील ११ जणांची ओळख पटली आहे. दरम्यान, मृत नक्षल्यांचा आकडा आणखी वाढण्याचा अंदाज असून, तो २२ पर्यंत जाईल, अशी शक्यता आहे.

काल(ता.२२)पहाटे भामरागड व एटापल्ली तालुक्यातील कसनासूर-बोरिया जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षली असल्याची माहिती मिळाल्याने सी-६० पथक व सीआरपीएफच्या बटालियन क्रमांक ९ चे जवान त्या भागात दाखल झाले होते. त्यानंतर झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले. त्यात ९ पुरुष व ७ महिला नक्षलवादी ठार झाले. जिल्ह्यात नक्षल चळवळीचा शिरकाव झाल्यापासूनच्या ३८ वर्षांतील पोलिसांनी केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. या चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांचे मृतदेह आज सकाळी साडेआठ वाजता गडचिरोलीत आणण्यात आले. दुपारपर्यंत त्यांची ओळख पटविण्यात आली. मृत १६ नक्षल्यांपैकी ११ जणांची ओळख पटली असून, उर्वरित ५ जणांची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली.

मृत नक्षल्यांमध्ये राजू उर्फ रमेश उर्फ नरेश कुटके वेलादी(२९)रा.बिजगाव, ता.भामरागड(गट्टा एलओएस कमांडर, बक्षीस ८ लाख रुपये, शस्त्र- एसएलआर), सन्नू उर्फ बिच्चू बोळका गावडे(४४) रा.कोरेपल्ली, ता.अहेरी(प्लाटून क्रमांक ७ सदस्य, बक्षीस ४ लाख, शस्त्र ३०३ रायफल), सिनू उर्फ श्रीकांत उर्फ रावतु विजेंद्र(५०) रा.सल्लाग्रीग, जि.वारंगळ,(दक्षिण डिव्हीजन विभागीय समितीचा सदस्य, बक्षीस २० लाख, शस्त्र एके-४७), अनिता उर्फ बाली रामजी मडावी(२४) रा.करमपल्ली, ता.भामरागड, साईनाथ उर्फ दुलेश मादी आत्राम(३२)रा.गट्टेपल्ली, ता.अहेरी, (पेरमिली दलम कमांडर तथा डीव्हीसी, बक्षीस १६ लाख, शस्त्र एके-४७), राजेश उर्फ दामा रायसू नरुटी, रा.मुरगाव, ता.धानोरा, (स्टाफ टीम पीपीसीएम, बक्षीस ४ लाख, शस्त्र ८ एमएम पिस्तोल), सुमन उर्फ जन्नी कुळवेटी(१८), रा.पळतनपल्ली, (प्लाटून क्रमांक ७ सदस्य, शस्त्र १२ बोअर बंदूक, बक्षीस ४ लाख), शांता उर्फ मंगली पदा(३१) रा.गंगालूर, जि.बिजापूर, (अहेरी दलम कमांडर, बक्षीस ८ लाख, शस्त्र एलएलआर), नागेश उर्फ दुलसा कन्ना नरोटे(३२)रा.झारेवाडा, ता.एटापल्ली, (पेरमिली दलम एसीएम, बक्षीस ६ लाख, शस्त्र ३०३ बंदूक), तिरुपती उर्फ धर्मू पुंगाटी(२४), रा.कोहकापरी, ता.भामरागड, (पेरमिली दलम सदस्य, बक्षीस २ लाख, शस्त्र १२ बोअर बंदूक) व श्रीकांत उर्फ दुलसा उर्फ रानू नरोटे(२३)रा.मोरखंडी, ता.पाखांजूर, छत्तीसगड, (पेरमिली दलम सदस्य, बक्षीस २ लाख, शस्तर १२ बोअर बंदूक) यांचा समावेश आहे. उर्वरित ५ नक्षल्यांचे ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचे अभियान सुरुच असून, मृत नक्षल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
R94S8
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना