सोमवार, 18 जून 2018
लक्षवेधी :
  महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग यांचा एल्गार परिषदेशी संबंध नाही, त्यांची तत्काळ सुटका करा: भाकप व ग्रामसभांच्या नेत्यांची मागणी             कोनसरीतील लोहप्रकल्प सर्वांच्या सहकार्यामुळेच-सत्काराप्रसंगी आ.डॉ.देवराव होळी यांचे प्रतिपादन             गडचिरोली येथे कारमेल हायस्कूलच्या मागे नवीन घर विकणे आहे, १६०० स्क्वेअर फूट प्लॉट व १२०० स्क्वेअर फूट बांधकाम-संपर्क ७९७२८८०५१३             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

५० हजारांची लाच स्वीकारताना गडचिरोली एसडीओ कार्यालयाचा लिपीक एसीबीच्या जाळ्यात

Monday, 23rd April 2018 08:57:14 PM

 

गडचिरोली, ता.२३: गिट्टीची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कुठलीही कारवाई न करण्यासाठी संबंधित ट्रकच्या मालकाकडून ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक साईनाथ नागोराव हमांद(३२) यास रंगेहाथ पकडून अटक केली. 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा नागपूर येथील रहिवासी असून, त्याचा बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय आहे. त्याचे स्वत:चे १० ट्रक असून, त्याद्वारे तो गिट्टी, रेती व गौण खनिजाची वाहतूक करीत असतो. २१ एप्रिल २०१८ रोजी त्याच्याकडील ५ ट्रकमध्ये प्रत्येकी १५.५ टन गिट्टी भरुन पहाटे १ वाजता तो उमरेड तालुक्यातील पाचगाव येथील सरगम स्टोन प्लँट येथून गडचिरोली जिल्ह्यातील गोविंदपूर येथील इंगवले पाटील यांच्या हॉटमिक्स प्लांटकरिता रवाना झाले. त्यानंतर कनिष्ठ लिपिक साईनाथ हमांद याने ३ ट्रक अडवून रॉयल्टीची वेळ १५ मिनिटांपूर्वीच संपल्याचे सांगून ट्रक ताब्यात घेतले.  तसेच चालकाकडील परवाना आपल्याकडे ठेवला व कोणतीही कारवार्ई न करता ट्रक सोडून दिले. त्यानंतर ट्रक मालकाने साईनाथ हमांद याच्याशी संपर्क साधला असता ट्रकवर कोणतीही कायदेशिर कारवाई न करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून व रॉयल्टीचे दस्तऐवज परत करण्याकरिता प्रत्येक ट्रकमागे ३० हजार याप्रमाणे ९० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो ५० हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला.

मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी काल सापळा रचून आरोपी साईनाथ हमांद यास तक्रारकर्त्याकडून ५० हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली. एसीबीने हमांद याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,१३(१)(ड) व १३(२) अन्वये  गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

एसीबीचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस निरीक्षक कविता ईसारकर, पोलिस निरीक्षक गणेश कदम, हवालदार अशोक बैस, अमोल फिस्के, श्री.कळंबे, राजेश तिवारी यांनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EAD1N
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना