शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

दरभंगा एक्सप्रेस थांब्याच्या मागणीसाठी शिवसेनेने वडसा येथे केले रेल रोको आंदोलन

Wednesday, 25th April 2018 07:04:40 AM

देसाईगंज, ता.२५: दरभंगा एक्सप्रेसला वडसा रेल्वेस्थानकावर थांबा द्यावा, या मागणीसाठी आज शेकडो शिवसैनिकांनी वडसा येथे रेल रोको आंदोलन केले.

दरभंगा-सिकंदराबाद ही एक्सप्रेस वडसा येथून जाते. परंतु वडसा येथे थांबा नसल्याने अनेक व्यापारी, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच चेन्नईला मोठ्या शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या रुग्णांची गैरसोय होते. चेन्नई येथे अनेक दुर्धर आजारांच्या शस्त्रक्रिया स्वस्त दरात होतात. त्यामुळे अनेक रुग्ण चेन्नईला जात असतात. परंतु वडसा येथे थांबा नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. यासंदर्भात शिवसेनेने अनेकदा मागणी करुन १५ दिवसांत मागणी पूर्ण न केल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु रेल्वे प्रशासनाने लक्ष न दिल्याने आज शिवसैनिकांनी रेले रोको आंदोलन केले. दरभंगा एक्सप्रेसला वडसा येथे थांबा देण्यात यावा, प्रवासी विश्रामगृह देण्यात यावे, तिकिट बूकिंग सुरु करावे, उपहारगृहाची व्यवस्था करावी इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, संपर्कप्रमुख किशोर पोद्दार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला आघाडी जिल्हाप्रमुख छाया कुंभारे, उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, तालुकाप्रमुख नंदू चावला, विभागप्रमुख डॉ.श्रीकांत बन्सोड, शहरप्रमुख अशोक माडावार, युवासेनाप्रमुख चंदू बेहरे, उपशहरप्रमुख विकास प्रधान, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनंदा आतला, सुशीला जयसिंगपुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिगंबर मेश्राम, महिला आघाडी तालुकाप्रमुख सरिता शिवरकर, दशरथ लाडे, भाग्यवान लांजेवार, नानू कोवासे, भूषण सातव, पुरुषोत्तम तिरगम, बंटी सलुजा, भूषण राठी, उपजिल्हाप्रमुख राजू कावळे, रामकिरीत यादव, सौ.बोकडे, रत्नाबाई दिघोरे, प्रेमिला शेंडे, गोलु फुकट, विजया वानखेडे, सेवादास खुणे, सावजी भोंडे, जसपाल चावला, डिंपल चावला, पंकज पाटील, जावेद कुरेशी, श्री.अली यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलकांनी अर्धातास रेल रोखून धरली. त्यानंतर नागपूरचे रेल्वे अधिकारी श्री.तोमर, रेल्वेचे पोलिस अधिकारी श्री.स्वामी यांच्याशी चर्चा करण्यात आली. येत्या २-३ महिन्यांत दरभंगा एक्सप्रेसला वडसा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5D0C4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना