मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

एसआरपीच्या पोलिस उपनिरीक्षकाची गोळी घालून आत्महत्या

Saturday, 28th April 2018 07:55:32 AM

गडचिरोली, ता.२८: राज्य राखीव दलात कार्यरत एका पोलिस उपनिरीक्षकाने कार्यालयातच त्याच्याकडील बंदुकीतून स्वत:वर गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना आज संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. राजेंद्र इंगळे(५३) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिस मुख्यालयाशेजारी व पोलिस अधिकाऱ्यांच्या वस्तीत ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे.  

राजेंद्र इंगळे हे गडचिरोली येथे राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक ४ मध्ये कार्यरत होते. एसआरपीचे कार्यालय पोलिस वसाहतीत असून, आजूबाजूला अनेक पोलिस अधिकारी व जवान वास्तव्य करतात. आज श्री.इंगळे कर्तव्यावर असताना त्यांनी आपल्या बंदुकीतून हनुवटीवर गोळी घातली. ही गोळी डोक्यातून बाहेर आली. यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. श्री.इंगळे हे अमरावती येथील रहिवासी होते. गडचिरोली पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

पोलिस जवानांनी गोळी घालून आत्महत्या केल्याच्या घटना अलिकडे बऱ्याच घडल्या आहेत. सुटी मिळत नसल्याने व कामाचा ताण असल्याने जवान आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. मात्र, श्री.इंगळे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय,याचा उलगडा तपासाअंतीच होणार आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9S15X
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना