शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

छत्तीसगडच्या महिला नक्षलीचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण

Wednesday, 2nd May 2018 02:23:30 AM

गडचिरोली, ता.२: छत्तीसगड राज्यातील नक्षल चळवळीत कार्यरत एका जहाल नक्षल महिलेने महाराष्ट्र राज्याच्या आत्मसमर्पण योजनेने प्रभावीत होऊन नुकतेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. ज्योती उर्फ रवीना जोगा पुडयामी(२६). रा.शिराकुंटा, ता.भोपालपट्टनम, (छत्तीसगड) असे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलीचे नाव आहे.

ज्योती ही २००९ मध्ये भोपालपट्टनम दलममध्ये भरती झाली. तेव्हापासून तिचा नक्षल कारवायांमध्ये सक्रिय सहभाग होता. सध्या ती तेलंगणा भागात कार्यरत मंगी दलममध्ये उपकमांडर पदावर होती. शासनाने तिच्यावर ४ लाखांचे बक्षीस ठेवले होते. महाराष्ट्र राज्याच्या पोलिस विभागाने आत्मसमर्पण करण्याचे केलेले आवाहन, त्यांच्यासाठी असलेली भूखंड योजना, नसबंदी रिओपनिंगसारखे निर्णय यामुळे प्रभावीत होऊन ज्योतीने गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. २०१८ मध्ये आतापर्यंत ९ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
YKNG0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना