गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

शांतनू गोयल यांची बदली, विजय राठोड गडचिरोली जिल्हा परिषदेचे नवे सीईओ

Wednesday, 2nd May 2018 05:08:09 AM

गडचिरोली,ता.२: राज्य सरकारने आज २७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत. गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल यांचे स्थानांतरण करण्यात आले असून, विजय राठोड हे गडचिरोलीला सीईओ म्हणून येणार आहेत.

शांतनू गोयल यांची परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर येणारे विजय राठोड हे २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या श्री.राठोड हे अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

शांतनू गोयल यांनी ३० एप्रिल २०१६ रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारला. विकास कामे सुरु असलेल्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन काम बघणारा अधिकारी म्हणून श्री.गोयल यांनी आपली ओळख निर्माण केली होती.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8L7RA
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना