गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

दारुसाठी पत्नीला जाळणाऱ्या पतीस ३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Saturday, 5th May 2018 06:06:49 AM

गडचिरोली, ता.५:  दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीच्या अंगावर केरोसीन ओतून तिला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. लालाजी पुंडलिक सोरपे रा. मौशीखांब, ता. गडचिरोली असे दोषी इसमाचे नाव आहे.

ही घटना आहे २७ ऑक्टोबर २०१६ ची. या दिवशी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास आरोपी लालाजी सोरपे याने पत्नीला दारु पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु तिने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे लालाजीने पत्नी स्वयंपाक करीत असताना तिच्यावर केरोसीन ओतून पेटते कोलीत तिच्या अंगावर फेकले. यामुळे ती ४५ टक्के जळाली. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान तिचे बयाण घेण्यात आले. या बयाणाच्या आधारे आरोपी लालाजी सोरपे याच्यावर आरमोरी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यावर तत्कालिन सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम साखरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी लालाजी सोरपे यास भादंवि कलम ३०७ अन्वये ३ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास ३ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. 

कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
S4410
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना