शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

नक्षल्यांनी जाळले एफडीसीएमच्या कामावरील दोन ट्रक

Tuesday, 8th May 2018 12:05:24 AM

गडचिरोली, ता.८: सशस्त्र नक्षल्यांनी आज मध्यरात्री एफडीसीएमच्या कामावरील दोन ट्रक पेटवून चालकास मारहाण केली. ही घटना मुलचेरा-एटापल्ली मार्गावरील गट्टा येथे घडली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

मुलचेरा परिसरात वनविकास महामंडळाचे काम सुरु असून, या कामावरील ट्रक रात्री गट्टा येथे ठेवण्यात येत होते. मात्र आज मध्यरात्री काही नक्षलवादी गट्टा येथे गेले. त्यांनी चालकांना झोपेतून उठवून ट्रक काम सुरु असलेल्या ठिकाणी नेण्यास सांगितले. नक्षल्यांनी ट्रक चालकास मारहाण करुन नंतर दोन्ही ट्रक पेटवून दिले. त्यानंतर गट्टा मार्गावर बॅनर लावले. त्यावर बोरिया येथे झालेल्या घटनेचा निषेध करीत असल्याचा मजकूर लिहिला आहे. या घटनेच्या निषेधार्थ १० मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन नक्षल्यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6SNO1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना