गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

दारुसाठी सासूला ठार करणाऱ्या जावयास आजीवन कारावासाची शिक्षा

Tuesday, 15th May 2018 07:23:52 AM

गडचिरोली, ता.१५:  दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने सासूच्या डोक्यावर काठीने प्रहार करुन तिला ठार करणाऱ्या जावयास येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आजीवन कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. डोलू गुंडी वड्डे रा. लाहेरी, ता. भामरागड असे दोषी इसमाचे नाव आहे.

रेकू पुसू वडदा ही तिच्या मुलीकडे राहत होती. ७ ऑक्टोबर २०१५ च्या संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास रेकूचा जावई डोलू वड्डे याने तिला दारु पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु रेकूने पैसे देण्यास नकार दिला.ञ त्यामुळे डोलूने रेकूच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. यात घटनास्थळीच रेकूचा मृत्यू झाला.  त्यानंतर रेकूची मुलगी सोनू डोलू वड्डे हिने लाहेरी पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार केली.  यावरुन पोलिसांनी आरोपी डोलू वड्डे याच्यावर भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण झाल्यावर तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक सुधीर घाडगे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी डोलू वड्डे यास भादंवि कलम ३०२ अन्वये आजीवन कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास ६ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
IU00G
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना