मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

पतीने केली पत्नीची गळा चिरुन हत्या

Monday, 4th June 2018 07:38:39 AM

गडचिरोली, ता.४: पतीने पत्नीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना काल रात्री दीड वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील जयनगर येथे घडली. माधुरी अमित बिस्वास(२६) असे मृत महिलेचे नाव असून, पोलिसांनी आरोपी अमित अमलिंबू बिस्वास (२९)यास अटक केली आहे.

अमित बिस्वास व माधुरी यांचा विवाह दोन वर्षापूर्वी झाला. परंतु विवाहानंतर अमित हा माधुरीला नेहमी मारहाण करुन माहेरी जाण्यास सांगत होता. काल मध्यरात्री त्याने माधुरीचा गळा चिरुन हत्या केली. दुसऱ्या महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून त्याने आपल्या पत्नीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माधुरीची बहीण शिवली मुजुमदार हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिस निरीक्षक गोरख गायकवाड घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A0048
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना