सोमवार, 18 जून 2018
लक्षवेधी :
  महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग यांचा एल्गार परिषदेशी संबंध नाही, त्यांची तत्काळ सुटका करा: भाकप व ग्रामसभांच्या नेत्यांची मागणी             कोनसरीतील लोहप्रकल्प सर्वांच्या सहकार्यामुळेच-सत्काराप्रसंगी आ.डॉ.देवराव होळी यांचे प्रतिपादन             गडचिरोली येथे कारमेल हायस्कूलच्या मागे नवीन घर विकणे आहे, १६०० स्क्वेअर फूट प्लॉट व १२०० स्क्वेअर फूट बांधकाम-संपर्क ७९७२८८०५१३             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

वृक्ष लागवडीसाठी प्रशासन सज्ज:जिल्हाधिकारी शेखर सिंह

Thursday, 7th June 2018 08:08:30 PM

गडचिरोली, ता.७: राज्य शासनाच्या वृक्ष लागवड योजनेंतर्गत यंदा जिल्ह्यात ५० लाख ७२ हजार ४२६ रोपांची लागवड करण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. गतवर्षीप्रमाणेच याहीवर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्रशासन ओलांडेल, असा विश्वास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, यंदा राज्यात १८ लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्याला ५० लाख ७२ हजार ४२६ रोप लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी वनविभाग २७ लाख ६७ हजार, सामाजिक वनीकरण विभाग २ लाख, एफडीसीएम १४ हजार १८ हजार, ग्रामविकास विभाग ४ लाख ९७ हजार, तर उर्वरित रोपांची लागवड विविध विभागांतर्फे करण्यात येणार आहे. यंदा १ जुलै ते ३१ जुलै असा महिनाभर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सुरु असणार आहे. वनविभाग व रोहयोच्या १२८ नर्सरीजमधून १ कोटी २४ लाख रोपे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या रोपांची लागवड करण्यासाठी वनविभाग व रोहयोमार्फत ५१ लाख ३९ हजार खड्डे खोदून तयार झाले आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

श्री.सिंह म्हणाले, वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वनविभाग ग्रामपंचायतींना मोफत रोपे वाटप करणार आहे. पारंपरिक व उपयुक्त वृक्षांची लागवड झाल्यास नागरिकांना लाभ होईल, या अनुषंगाने सागवान, बांबू, आवळा, वनौषधी, फळझाडे व अन्य वृक्षांची लागवड करण्यावर प्रशासन भर देणार आहे. जनजागृतीसाठी ११ जूनला सामूहिक वनहक्क मिळालेल्या ग्रामसभांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. १ जुलैला शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची दिंडी, चित्ररथ या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहितीही श्री.सिंह यांनी दिली. नेमके किती वृक्ष लावले आणि किती जीवंत आहेत, याविषयीची माहिती अॅपवर उपलब्ध असणार आहे. मागच्या वर्षी रोपे जीवंत असल्याचे प्रमाण ८५ टक्के होते. यंदा हे प्रमाण वाढावे, याची खबरदारी प्रशासन घेईल, असे श्री.सिंह यांनी सांगितले. वृक्षलागवडीसाठी समाजाच्या विविध स्तरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था व अन्य मंडळींनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी अशोक चौधरी, प्रकल्प संचालक श्री.पठारे उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
601SE
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना