सोमवार, 18 जून 2018
लक्षवेधी :
  महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग यांचा एल्गार परिषदेशी संबंध नाही, त्यांची तत्काळ सुटका करा: भाकप व ग्रामसभांच्या नेत्यांची मागणी             कोनसरीतील लोहप्रकल्प सर्वांच्या सहकार्यामुळेच-सत्काराप्रसंगी आ.डॉ.देवराव होळी यांचे प्रतिपादन             गडचिरोली येथे कारमेल हायस्कूलच्या मागे नवीन घर विकणे आहे, १६०० स्क्वेअर फूट प्लॉट व १२०० स्क्वेअर फूट बांधकाम-संपर्क ७९७२८८०५१३             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

तीनशे रुपयांची लाच स्वीकारणारा वनमजूर एसीबीच्या जाळ्यात

Friday, 8th June 2018 09:00:22 PM

गडचिरोली, ता.८: सागवान पलंगाची वाहतूक करण्यासाठी वाहतूक परवाना देण्याकरिता तक्रारकर्त्याकडून केवळ तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली येथील उपक्षेत्र वनविभाग कार्यालयातील वनमजूर प्रभाकर जैराम निमजे यास रंगेहाथ पकडून अटक केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा शिक्षण घेत असून, रोजंदारीचे काम करतो. त्याने आपल्या वैयक्तिक बचतीतून दोन वर्षांपूर्वी सागवान लाकडाचे दिवाण खरेदी केले होते. ते दिवाण स्वगावी नेण्यासाठी त्याला वाहतूक परवाना आवश्यक होता. त्यासाठी त्याने गडचिरोली येथील उपक्षेत्र वनविभाग कार्यालयाकडे रितसर अर्ज केला होता. परंतु वनमजूर प्रभाकर निमजे याने त्यास वाहतूक परवाना मिळवून देण्यासाठी ३०० रुपयांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज उपक्षेत्र वनविभाग कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रभाकर निमजे यास तक्रारकर्त्याकडून ३०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, १३(१)(ड), सहकलम १३(२) अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली.

एसीबीचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील , पोलिस उपअधीक्षक डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, रवींद्र कत्रोजवार, सुधाकर दंडिकवार, महेश कुकुडकार, गणेश वासेकर, सोनल आत्राम, सोनी तावाडे, तुळशीदास नवघरे, घनश्याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
Q054A
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना