सोमवार, 18 जून 2018
लक्षवेधी :
  महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग यांचा एल्गार परिषदेशी संबंध नाही, त्यांची तत्काळ सुटका करा: भाकप व ग्रामसभांच्या नेत्यांची मागणी             कोनसरीतील लोहप्रकल्प सर्वांच्या सहकार्यामुळेच-सत्काराप्रसंगी आ.डॉ.देवराव होळी यांचे प्रतिपादन             गडचिरोली येथे कारमेल हायस्कूलच्या मागे नवीन घर विकणे आहे, १६०० स्क्वेअर फूट प्लॉट व १२०० स्क्वेअर फूट बांधकाम-संपर्क ७९७२८८०५१३             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

राहुल गांधी १३ जूनला नागभिड तालुक्यात

Monday, 11th June 2018 01:21:36 PM

गडचिरोली, ता.११: काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी बुधवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत‍ असून, नागभिड तालुक्यातील नांदेड येथील दिवंगत दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

'एचएमटी' या धानाच्या लोकप्रिय वाणाचे जनक दादाजी खोब्रागडे यांचे ३ जून रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते नांदेड येथील रहिवासी होते. त्यांच्या निधनाची बातमी माहित होताच खा.राहुल गांधी यांनी नांदेड येथे जाऊन खोब्रागडे कुटुंबीयांची भेट घेण्याचा मानस व्यक्त केला.

त्यानुसार, बुधवारी सकाळी साडेदहा वाजता खा.राहुल गांधी यांचे नांदेड येथे आगमन होईल. सुरुवातीला ते दिवंगत दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करुन त्यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतील. या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, सामान्य नागरिक, तसेच काँग्रेस, युवक काँग्रेस व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवक काँग्रेसचे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
GVRG5
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना