/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१४: चंद्रपूर-गडचिरोली-राजनांदगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ आज खा.अशोक नेते यांच्या हस्ते लांझेडा येथे करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आ.डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपचे शहराध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते. ३३२ कोटी रुपये खर्च करुन सिमेट काँक्रिटचा हा महामार्ग तयार करण्यात येणार आहे. यावेळी खा.अशोक नेते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाचा आराखडा तयार केला असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे चार वर्षांत अनेक विकास कामे झाली आहे. नागपूर-आरमोरी-गडचिरोली या मार्गाचे कामही सुरु झाले आहे. वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे हे कामही लवकरच सुरु होईल, अशी ग्वाही.खा.नेते यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाला नगर परिषद सभापती अनिता विश्रोजवार, नगरसेवक नंदू काबरा नगरसेवक रमेश भुरसे, भाजपा तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, पंचायत समिती सदस्य मारोतराव ईचोडकर, नगरसेविका अल्का पोहनकर, वर्षा नैताम, रितु कोलते, केशव निंबोड, मुक्तेश्वर काटवे, तालुका महामंत्री बंडू झाड़े, श्रीकृष्ण कावनपुरे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, अविनाश विश्रोजवार, निंबाळकर उपस्थित होते.