गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

राज्यपालांचा विद्यार्थीर्नींशी तेलगुत संवाद

Thursday, 6th November 2014 08:04:41 AM

गडचिरोली,दि.6:- राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज प्रथमच 6 नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्हयाच्या आगमन प्रसंगी सिरोंचा येथील जिल्हापरिषदेच्या कस्तुरबा गांधी बालीका विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. 

राज्यपालांची सुध्दा या शाळेला प्रथमच भेट असल्याने विद्यार्थिंनींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहता होता.  या कार्यक्रमाला राज्यपालाचे प्रधान सचिव उमेशचंद्र रस्तोगी, विभागीय आयुक्त अनुपकूमार, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक रविंद्र कदम, जिल्हाधिकारी रणजीत कुमार, पोलिस अधिक्षक संदिप पाटील, सिरोंचा पंचायत समितीचे सभापती रहीम शेख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. नरड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

प्रवेशव्दारावर राज्यपालांचे मुलींच्या लेझीम पथकाने स्वागत केले.  कस्तुरबा गांधी बालीका विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आपल्या कौशल्यातुन तयार केलेल्या साहित्याची पाहणी राज्यपालानी  यानिमित्ताने लावण्यात आलेल्या प्रदर्शनितुन केली. विद्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती मुख्याद्यापिका श्रीमती मनिषा साखरे  यांनी राज्यपालांना दिली.  राज्यपालांनी विद्यार्थींनींशी संवाद साधताना मुलींना येणाऱ्या अडचणीची माहिती जाणुन घेतली.  स्वच्छ भारत अभियान तुम्ही विद्यालयात राबविता काय ? याबाबत राज्यपालांनी विद्यार्थींनींना विचारणा केली.  याबाबत सकारात्मक उत्तर विद्यार्थिनीनी राज्यपालांना दिले.  तुम्ही जेवणापुर्वी हात धुता काय ?  तुमच्या भोजणाची वेळ किती वाजताची आहे. ही माहिती राज्यपालांनी जाणुन घेतली.  प्रदर्शनात लावण्यात आलेले साहित्य व वस्तु चांगल्या आहेत असे विद्यार्थिनींचे कौतुकही राज्यपालांनी केले.  यावेळी त्यांनी संगणक कक्षालसुध्दा भेट दिली.  यापुढेही शिक्षण सुरुच ठेवा असा मोलाचा सल्ला राज्यपालांनी दिला. 

इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेणारी सुकना मडावी  राज्यपालांना म्हणाली की, आमच्या शाळेमध्ये केवळ 10 वी पर्यंतच शिक्षण आहे. पुढील शिक्षणाची सुविधा सुध्दा इथेच उपलब्ध  व्हावी .  अशी अपेक्षा तीने व्यक्त केली.  प्रियंका कावळे (वर्ग 9 वा )हीने शाळेतच व्यावसायीक शिक्षण मिळाले पाहीजे.  तर सुमलता सब्बीदी (इयत्ता 10 वी ) हीने सिरोंचा तालुका विकासासाठी आपण दत्तक घ्यावा असी अपेक्षा राज्यपालांकडे व्यक्त केली. 

कार्यक्रमाला कस्तुरबा गांधी विद्यालयातील 6 वी ते 10 पर्यंत शिक्षण घेणाऱ्या 144मुलींची उपस्थिती होती.  विशेष म्हणजे राज्यपालांनी विद्यार्थिनींशी तेलगु भाषेतुन संवाद साधल. कार्यक्रमाचे  सुत्र संचालन व उपस्थितांचे आभार माधवी मादेशी या शिक्षीकेनी मानले. 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
NYU41
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना