/* */
शनिवार, 30 सप्टेंबर 2023
लक्षवेधी :
  गडचिरोली:सिझेरियन प्रसूती झालेल्या दोन महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ             लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या घडकेत एकाच कुटुंबातील ३ जण ठार, १ जखमी-चामोर्शी येथील घटना             ३३ टक्के आरक्षण देऊन पंतप्रधानांनी महिलांचा सन्मान केला: खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन           

अल्पावधीतच समाजमन जिंकणाऱ्या नगराध्यक्ष योगिताताई

Monday, 8th July 2019 12:24:19 AM

 

गडचिरोली, ता.८: आदिवासीबहुल व विकासाच्या बाबतीत उपेक्षित असलेल्या जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेली गडचिरोली नगर परिषद नेहमीच राज्यकर्त्यांना आकर्षित करीत असते. या नगर परिषदेतील सत्तेच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात राजकारणाला समाजकारणाची जोड देत नगराध्यक्ष कसा असावा, या नागरिकांच्या अपेक्षेवर खरे उतरत अल्पावधीतच समाजमन जिंकून घेत जनतेचा नगराध्यक्ष म्हणून योगिताताईंनी नावलौकिक मिळविला.

प्रमोद पिपरे यांच्या अर्धांगिणी असलेल्या योगिताताईंचे संभाषण चातुर्य, समाजाला सोबत घेऊन चालण्याची वृत्ती व प्रत्येकाला मदतीचा हात देण्याची तयारी या गुणांमुळे नागरिकांनी त्यांना शहराचा प्रथम नागरिक बनण्याची संधी बहाल केली. विकासाच्या बाबतीत उपेक्षित असलेल्या गडचिरोलीला'स्मार्ट सिटी' बनविण्याचा ध्यास बाळगत योगिताताईंच्या नेतृत्वात अडीच वर्षांच्या कार्यकाळात शहरात विविध विकासकामांचे सत्र सुरु झाले. केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधीचा निधी खेचून आणत शहराचा कायापालट करण्याचे प्रयत्न योगिताताईंनी सुरु केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांतूनच शहरातील ९२.१० कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. भूमिगत गटारांबरोबरच ३ कोटी रुपये खर्चून आठवडी बाजाराचे रुपही पालटलेले आपणास दिसत आहे. नागरिकांना चोवीस तास मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा मानस योगिताताई व्यक्त करतात. यासाठी मीटरद्वारे नळाचे पाणी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवाय सुभाषवॉर्डातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून २.६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, विसापूरसाठी २.१६कोटी, तर शहरातील पाईपलाईनसाठी ५६लाख रुपयांची तरतूद करुन ही कामे पूर्णत्वाच्या दिशेने जात आहेत.

शहराचे सौंदर्यीकरण हा त्यांच्या आवडीचा विषयआहे. म्हणूनच ओपन स्पेसचा विकास करण्यासाठी ४.७८ कोटीरुपये, वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत वृक्षलागवड व इतरकामांसाठी ५०लाख, ८ रस्त्यांच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला १४ कोटी ७८लाख, दलित वस्ती सुधारण्यासाठी ५४ लाख, नगरोत्थानासाठी २कोटी, विशेष रस्ता अनुदान १६लाख, रस्ता अनुदान ६०लाख, जिल्हा वार्षिक योजनेतून अनुसूचित जातीच्या उपयोजनेसाठी ३०लाख, स्वच्छ भारत अभियानांतर्गत ८९लाख असे १० कोटी रुपये खर्च केले जात आहे. प्रत्येक घर मालकाला प्रॉपर्टी कार्ड देण्याचे उद्दिष्ट असून, याविषयीचे सर्वेक्षण पूर्ण होताच प्रक्रिया सुरु केली जाणारआहे. नगरपरिषदेच्या १० शाळा डिजीटल करण्यात आल्या असून, या शाळांतील विद्यार्थ्यांना आरओचे पाणी पुरविलेजाणारआहे.

शहरात नगरपरिषद प्रशासन भवन, नाट्यगृह, बगिचा, जलतरण तलाव व आवश्यक तेथे मुलभूत सोयी सुविधा निर्मितीसाठी योगिताताई कटिबद्ध आहेत. केवळ अडीच वर्षाच्या कार्यकाळात विकासाच्याबाबतीत गरुडझेप घेताना योगिताताईंनी समाजमनावर आपली वेगळी छाप सोडली आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
08623
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना