मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

११६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर

Thursday, 30th April 2020 11:45:46 PM

गडचिरोली,ता.३०: लोकसभा व विधानसभा निवडणुकीत केलेली कामगिरी तसेच नक्षलविरोधी अभियानात मिळविलेले घवघवीत यश यामुळे जिल्ह्यातील ११६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर करण्यात आले आहे.

यात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अपर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह ४ उपविभागीय पोलिस अधिकारी, ३ सहायक पोलिस निरीक्षक, २१ पोलिस उपनिरीक्षक, ७ सहायक फौजदार व ७८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या सतर्कतेमुळे कुठलाही अनूचित प्रकार घडला नाही. शिवाय वर्षभरत जहाल नक्षली नर्मदाक्का हिच्यासह २२ नक्षल्यांना पोलिसांनी अटक केली. जहाल नक्षली विलास कोल्हा याच्यासह ३५ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले, तर ९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले. या कामगिरीचे कौतूक म्हणून ११६ जणांना पोलिस महासंचालकांनी पदक जाहीर केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EPN98
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना