शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोलीच्या उच्चशिक्षित तरुणांनी सुरु केली ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा

Wednesday, 15th July 2020 07:04:19 AM

गडचिरोली,ता.१५: येथील चार उच्चशिक्षित तरुणांनी आपल्या कौशल्याचा वापर करीत शहरात ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा सुरु केली आहे. या सेवेचा शुभारंभ गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते  आज करण्यात आला.

यामुळे आता गडचिरोलीवासीयांना वेज, नानवेज फूड, चना मंचुरीयन, समोसे व अन्य गरमागरम खाद्य पदार्थ घरपोच मिळणार आहेत.  याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी लॉकडाऊनच्या काळात घरपोच डिलीव्हरी सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल ‘ऑनलाईन गडचिरोली’ संस्थेचे संचालक रितेश कुर्वे, रियाझ पठाण, विकास भुरले, उज्ज्वल कुर्वे यांचे कौतूक केले. इतरांनीही यापासून प्रेरणा घ्यावी, तसेच नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खा.नेते यांनी यावेळी केले.

 नागरिकांना www.onlinegadchiroli.com  या वेबसाईटवर हव्या असलेल्या पदार्थाची मागणी नोंदविता येईल. मागणी नोंदविल्याबरोबर काही मिनिटांतच संबंधित व्यक्तीला घरपोच पदार्थ आणून दिला जाईल. लवकरच onlinegadchiroli या मोबाईल अॅपचीही निर्मिती करण्यात येणार असून, त्यावरही मागणी नोंदविता येणार आहे.

उच्चशिक्षित तरुणांनी सुरु केला हा व्यवसाय

ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवेचा व्यवसाय सुरु करणारे चारही युवक उच्चशिक्षित आहेत. विकास भुरले व उज्ज्वल कुर्वे या दोघांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. रितेश कुर्वे हा अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे, तर रियाझ पठाण याने बीएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. या उच्चशिक्षीत तरुणांनी सुरु केलेला हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असा आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
27SV0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना