/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता़१०
मनुष्य हा आजीवन विद्यार्थी असतो, असे म्हणतात़ तो कर्मचारी असो की मजूऱ, व्यावसायिक असो की शेतकरी; दररोज तो पुस्तकातून, वर्तमानपत्रातून, इंटरनेटच्या माध्यमातून काही ना काही शिकत असतो़ अनुभव आणि निसर्गही त्याला शिक्षित करीत असतो़ हे शिक्षण कधी ना कधी त्याला कामी येत असते़ कर्मचार्यांना तर पदोन्नती, वेतनवाढ व अन्य फायदे मिळत असतात़ त्यासाठी अनेक कर्मचारी आपले कर्तव्य बजावून शैक्षणिक पात्रता वाढविण्याचा प्रयत्न करीत असतात़ मात्र, काही कर्मचारी पद आणि पैशाच्या लालसेने केव्हा शिक्षणाची ऐशीतैशी करतील, याचा नेम नाही़ विशेषत: शिक्षकांना सेवेत राहून बीएड सारखे शिक्षण घ्यावयाचे असल्यास त्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ व हैदराबादच्या एका विद्यापीठातून शिक्षण घेण्याची अनुमती आहे़ परंतु गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत काही शाळांमध्ये कार्यरत असलेल्या काही शिक्षकांनी भलत्याच विद्यापीठांमधून बीएडची पदवी घेतली आहे़ त्यांनी आपल्या या उच्चशिक्षणाची नोंद सेवापुस्तिकेत करण्यास संबंधितांना भाग पाडले असून, पदोन्नतीसाठी तसा अर्जही दिल्याचे समजते़ गडचिरोली जिल्ह्यातील हे ‘गुर्जी’कोण?