शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

प्राचार्य डॉ.संजय भांडारकर यांची राज्यस्तरीय गणित मास्टर ट्रेनर म्हणून निवड

Friday, 25th September 2020 08:56:10 PM

गडचिरोली,ता.२६: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, विद्या प्राधिकरण पुणे, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय गणित मास्टर ट्रेनर परिक्षेत लखमापूर बोरी येथील भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय राधेश्याम भांडारकर हे उत्तीर्ण झाले असून, त्यांची मास्टर ट्रेनर म्हणून निवड झाली आहे.

या परिक्षेत गडचिरोली जिल्ह्यातून २३ गणित शिक्षकांनी भाग घेतला होता. त्यापैकी केवळ डॉ.भांडारकर यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. राज्यातील ३२३ गणित शिक्षकांनी ही परिक्षा उत्तीर्ण केली असून, त्यांचे प्रशिक्षण आयआयटी मुंबईद्वारा लोणावळा येथील सिंहगड इन्स्टीट्यूट येथे आयोजित करण्यात आले होते.

या यशाबद्दल भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर, सचिव,आ.धर्मरावबाबा आत्राम, उपाध्यक्ष दौलतराव आत्राम व पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य डॉ.भांडारकर यांचे अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
13J06
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना