शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

कृषी विधेयक:भाजप कार्यकर्त्यांनी केला महाविकास आघाडी सरकारचा निषेध

Wednesday, 7th October 2020 06:42:18 AM

 गडचिरोली, ता.०७: केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकास राज्यातील महाआघाडी सरकारने स्थगिती दिल्याबद्दल आज भाजप कार्यकर्त्यांनी गडचिरोली व चामोर्शी येथे संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊन निषेध नोंदविला.

जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता निदर्शने न करता केवळ निवेदने देऊन भाजपने आपला निषेध नोंदविला. गडचिरोली येथे खा.अशोक नेते यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. चामोर्शी येथेही भाजप कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन महाआघाडी सरकारचा निषेध करीत कृषी विधेयकावरील बंदी उठविण्याची मागणी केली. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VJY66
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना