शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Friday, 16th October 2020 07:10:36 AM

गडचिरोली,१६: अल्पवयीन मतिमंद व अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने १५ वर्षांचा कारावास व ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. संजय गोवर्धन वाकडे(३२)रा.देलोडा,ता.आरमोरी असे शिक्षा झालेल्या दोषी इसमाचे नाव आहे.

ही घटना २ सप्टेंबर २०१८ ची आहे. या दिवशी पीडित मुलगी आपल्या अंगणात बसली असताना संजय वाकडे तिच्याजवळ गेला. त्यानंतर तिला तिच्या काकाच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. काही वेळाने पीडितेची आजी घरी आली असता तिला ती रडताना दिसली. शिवाय आरोपी तिच्यावर अतिप्रसंग करीत असल्याचे दिसून आले. पीडित मुलीची आई शेतावरुन परतल्यानंतर तिने आरमोरी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी संजय वाकडे याच्यावर भादंवि कलम ३७६(२), सहकलम ४, ६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक शीतल राणे यांनी आरोपीविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या खटल्याचा निकाल लागला. न्यायालयाने फिर्यादी व साक्षदारांचे बयाण नोंदवून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी संजय वाकडे यास १५ वर्षांचा कारावास व ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच पीडित मुलीस ५५ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेशही पारित केला.

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांनी जबाबदारी सांभाळली.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9DMLU
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना