गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

पद्मश्री प्रकाश आमटे ‘महाराष्ट्र भूषण’ निवड समितीवर

Friday, 16th October 2020 08:18:47 PM

गडचिरोली,ता.१६: प्रख्यात समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांनी राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ निवड समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला प्रदान करण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती या पुरस्कारर्थींची निवड करते. त्यानुषंगाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीत मुख्यमंत्री अध्यक्ष, उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष, तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री, राज्यमंत्री सांस्कृतिक कार्य, सचिव सांस्कृतिक कार्य, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय हे शासकीय सदस्य असतील. अशासकीय सदस्य म्हणून प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे, उद्योजक बाबा कल्याणी, क्रीडा क्षेत्रातून संदीप पाटील व कला क्षेत्रातून अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
PD445
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना