मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रम निर्मिती मंडळावर

Tuesday, 3rd November 2020 02:36:51 AM

गडचिरोली,ता.३: दंडकारण्‌य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व कुरखेडा येथील श्री.गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांची मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रम निर्मिती व आराखडा निर्माण समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्राचार्य डॉ.मुनघाटे हे गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट, विद्या परिषद, व्यवस्थापन परिषद, तसेच इतर प्राधिकरणांवरही कार्यरत आहेत. यापूर्वी डॉ.मुनघाटे यांनी नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. युनेस्को, एशिया पॅसिफिक क्वॉलिटी नेटवर्क यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांशीही ते निगडित असून, अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत. या नियुक्तीबद्दल डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांचे शैक्षणिक वर्तुळात अभिनंदन केले जात आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
PN8HR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना