बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

कुरखेड्याच्या नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या आशा तुलावी यांची बिनविरोध निवड

Monday, 9th November 2020 05:55:39 AM

कुरखेडा,ता.९: कुरखेडा येथील नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या आशा तुलावी यांची आज आयोजित विशेष सभेत अविरोध निवड करण्यात आली

कुरखेडा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद हे अडीच वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या महिलेकरिता राखीव ठेवण्यात आले होते. तेव्हा या पदाकरिता दोन उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. मात्र, एका उमेदवाराच्या जात प्रमाणपत्रावर हरकत घेण्यात आल्याने हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून अडकले होते.विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अवघा २० दिवसांचा कालावधी शिल्लक असताना प्रशासनाने निवडणुकीची घोषणा केली होती. त्यानुसार आज नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यासाठी महाविकास आघाडीतर्फे आशा तुलावी व भाजपा समर्थित शाहेदा मुघल यांनी नामांकन दाखल केले होते. मात्र,शाहेदा मुघल यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने निरस्त केल्याने त्यांचे नामांकन रद्द करण्यात आले. तेव्हाच आशा तुलावी यांचा अविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

आज निवडणूक प्रक्रियेदरम्यान आशा तुलावी यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची नगराध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांनी जाहीर केले. अध्यक्षपदाच्या निवडीची घोषणा होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी जल्लोष केला. याप्रसंगी शिवसेना गटनेते डॉ. महेन्द्रकुमार मोहबंसी, कांग्रेस नेते तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, प्रल्हाद कऱ्हाडे, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख आशिष काळे, जयेंद्रसिंह चंदेल, पंचायत समिती उपसभापती श्रीराम दुगा, पंचायत समिती सदस्य गिरीधर तितराम, अशोक इंदूरकर,शोएब मस्तान,पुंडलिक निपाने, नगरसेविका जयश्री धाबेकर,अनिता बोरकर,चित्रा गजभिये,पुंडलिक देशमुख,सोनू भट्टड, मनोज सिडाम,उसमान पठान व कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी समाधान शेडगे, सहायक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी नमिता बांगर यांनी काम पाहिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
59S1U
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना